today breaking news : शिंदे सरकारला मोठा दिलासा, राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच राहणार

today breaking news : सर्वोच्च न्यायलयाने 16 आमदारांच्या अपात्रेचा निर्णय अध्यक्षांकडे सोपवला.  आमदारांच्या अपात्रतेबाबत घटनेचं तंतोतंत पालन करून लवकरात लवकर निर्णय़ घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी(Rahul Narvekar) सांगितलंय. व्हिप एकच असतो, त्यामुळे पक्ष नेमका कोणता हे ठरवावं लागणार, असल्याचं नार्वेकर म्हणालेत.Sharad Pawar Rection : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर सुप्रीम कोर्टानं टिप्पणी केलीय. त्यावर शरद पवारांनी मात्र आता चर्चा नको, त्याबद्दल पुस्तकात लिहिलंय, अशी प्रतिक्रिया दिलीय. आजच्या निकालात सुप्रीम कोर्टानं तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर जोरदार ताशेरे ओढलेत. त्यावर कोश्यारींनी प्रतिक्रिया दिलीय. माझ्याकडे कुणी राजीनामा देत असेल तर मी राजीनामा देऊ नका, असं सांगू का, असा सवाल कोश्यारींनी विचारलाय. 

today breaking news : उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय. उद्धव ठाकरेंनी विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा होता असंही मविआच्या नेत्यांनी म्हंटलंय. ‘सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पूर्णपणे समाधानी’, सत्तासंघर्षाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची(Devendra Fadanvis) प्रतिक्रिया. ‘सरकार जाणार बोलणाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी’, देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंना टोला. राजकीय पक्ष कोणता हे स्पीकर ठरवणार असल्याचं फडणवीस यांची माहिती. कोर्टानं आमचं सरकार घटनात्मक ठरवलं- फडणवीस.today breaking news

उद्धव ठाकरेंनी नैतिकतेची भाषा करु नये-फडणवीस

today breaking news : उद्धव ठाकरेंनी नैतिकतेची भाषा करु नये, जेव्हा उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली त्यावेळी ठाकरेंची नैतिकता कुठल्या डब्यात बंद होती, असा सवाल फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केला.

  • नैतिकता असेल तर माझ्यासारखा राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरं जावं, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलंय. गद्दारांनी माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणं मला मान्य नव्हतं, त्यामुळे राजीनामा दिल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार. महाराष्ट्र सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस मंत्रालयात दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार
  •  ‘कोर्टाच ऐतिहासिक निर्णय’, ‘कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत’, सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया. 
  • शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा मिळालाय. आमदार अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे सोपवण्यात आलाय. राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकारच कायम राहणार.
  • व्हीप प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाला धक्का, भारत गोगावलेंची व्हीपपदी नियुक्ती गैर, संसदीय पक्षाच्या नेत्याला व्हीपचा अधिकार नाही, सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाला फटकारलं.
  • सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात निकाल वाचनाला सुरूवात. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडून निकाल वाचनाला सुरुवात. महाराष्ट्र सत्तासंघर्षाचं प्रकरण 7 जणांच्या घटनापीठाकडे,  27 जूनला 7 जणांच्या घटनापीठाकडे सुनावणी.
  • सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झी २४ तासला दिलीये.
  •  महाराष्ट्र सत्तासंघर्षावरचा निकाल आज अर्धातास उशिरा लागण्याची शक्यता. सकाळी 11.30 वाजता निकाल लागण्याची शक्यता. माजी चीफ जस्टीस अहमदी यांच्या निधनामुळे शोकसभा असल्यानं सत्तासंघर्षाचा निकाल उशिरानं लागण्याची शक्यता. 

Mahrashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर असं असेल सत्तेचं समीकरण

today breaking news : ‘फडणवीसांना सत्याची जाणीव झाली असावी’, ‘जयंत पाटलांवर  राष्ट्रवादीचे प्रवक्ते बोलतील’,’निकालावर बोलणाऱ्या मूर्खांना आवरावं’, ‘सरकारला धोका नाही असं कसं म्हणता?’,’प्रकरण तत्काळ झिरवळांकडे यावं’, ‘हे सरकार क्षणभरही राहणार नाही’,’सरकारबाबत अजित पवारांचं वैयक्तिक मत’,’मुख्यमंत्री अपात्र ठरले तर सरकार कोसळणार’, ’16 अपात्र ठरले की 24ही अपात्र’, खासदार संजय राऊत शिंद-फडणवीस सरकारवर टीका. 

today breaking news : ‘विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती घटनाबाह्य’,’न्याय विकत घेणारे सत्तेत’, ‘तेव्हाच्या उपाध्यक्षांकडे निर्णय यावा’, ‘लोकशाही आहे की नाही याचा फैसला’, ‘निकालावर आधीपासून फडणवीसच बोलत आहेत’, ‘कोर्ट संविधानाची हत्या करणार नाही”, खासदार संजय राऊत यांचं शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल. 

 बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आज मुंबई दौ-यावर येणार आहेत.. मुंबईत ते उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेतील.